पेंद्या म्हणे ऋषेकेशी । आरुष बोबडे परियेसी ॥
यारे यारे अवघेजन । गाऊ हरिनाम कीर्तन ॥
कान्होपाठक बागडा । नाचे वैष्णवा पुढा ॥
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एक गाव ‘केंदूर ‘ या गावी श्री ज्ञानेश्वर
महाराज ज्यांना अत्य़ंत आपुलकीने व आदराने ‘काका’ म्हणत असे कान्हुराज वारकरी संप्रदायातील थोर संत होते.कान्होपाठक हे यर्जुवेदी कुळातील ब्राम्हण होते व त्यांना राजमान्यता ही होती.
कान्होपाठक सिध्दयोगी होते म्हणून ज्ञानेश्वराच्यां समाधीच्या वेळी संत नामदेव
महारांजस दु:खाचा गहिवर अवरेना त्यामुळे नामदेव किर्तन करु शकले नाहित तेव्हा सर्व संतानी ज्ञानेश्वराच्यां समाधीचे किर्तन
कान्होपाठकांस करण्यास लावले.
अश्या कान्हुराज महाराजांची माहिती केवळ स्थानिकांना आणि नियमित येणार्या भाविकांनाच आहे त्यांची माहिती आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात येणाऱ्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची जाणीव ,त्यांचा वारसा काय आहे यांची माहिती करून देणे आणि ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी "वारकरी संप्रदायाचा " पाया रोवला ,तो वारकरी संप्रदाय जगाच्या काना -कोपऱ्यात पोहचवणे हा या संकेत स्थळाचा उद्देश आहे .
|